Posts

मिर्झा यहया बेग 'हाफिज-ए-कुरान' पदवीने सन्मानित

Image
  देगलूर /जावेद अहमद :- देगलूर येथील मिर्झा खदीर बेग यांचे सुपुत्र मिर्झा यहया बेग यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी अत्यंत कठीण मानली जाणारी 'हाफिज-ए-कुरान' ही पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मिर्झा यहया बेग यांनी २०२३ मध्ये हैदराबाद येथील नामांकित धार्मिक संस्था 'अशरकुल उलूम' येथे प्रवेश घेतला होता. अत्यंत चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी केवळ तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत हफीज ए कुराण ची पदवी प्राप्त केली. बिलोली येथे मुस्लिम समाजाच्या वतीने एका सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिर्झा यहया बेग यांचा शाल, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने हाजी मंसुर खान, फैजोदिन कुरेशी, फारुकी सर, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज, जावेद सर आणि मिर्झा खदीर बेग यांचा समावेश होता. उपस्थित सर्व मान्यवरांनी यहया बेग यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कमी वयात मिळवलेल्या या यशामुळे मिर्झा यहया बेग यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

आटपाट नगरचा राजा... आणि 6 हजार स्क्वेअर फूटाचा प्लॉट!

  वाचक मित्रांनो,           रोजच्या बातम्यांच्या गर्दीतून थोडा विरंगुळा म्हणून आज एक गोष्ट सांगतो, पण ही गोष्ट केवळ गोष्ट नसून लोकशाहीच्या आरशात दिसणारी एक वस्तुस्थिती आहे. "तुम्हाला एका गावाची...लोकशाहीतील राजाची...अन् त्याच्या कारभाराची गोष्ट सांगत आहे. दोन प्रदेशांच्या सीमेवर एक आटपाट नगर होते. इतिहासाने समृद्ध, परंपरेने नटलेले आणि स्वतंत्र परागणा (तालुका) होण्याची क्षमता असलेले हे नगर. ऐवढेच नव्हे तर स्वतंत्र तरफ / स्वतंत्र महाल (नगर पंचायत) होवू शकते... आटपाट नगर ही ऐतिहासिक नगरी व शेकडो वर्षांची पार्श्वभूमी असलेला ऐवढेच नव्हे ज्या 'महाला'तून या आटपाट नगरचा राज्य कारभार चालतो, त्याला शतकीय काळ उलटला. ही बाब अलाहिदा की, आटपाट नगरच्या राजाने अन् प्रधान मंडळाने 'रौप्य महोत्सव' सोहळा साजरा केला नाही. " आटपाट नगरचा राज्यभार ज्या राजाच्या माध्यमातून हाकलला जातो, तो विद्वान, सुसंस्कृत अन् मानमरताब असलेला आहे. प्रजेला त्यांचा 'राजतिलक' करतांना खूप खूप आनंद झाला होता आणि त्याच्याकडून खूप खूप आशा होत्या. राज्याचा चहूबाजूंनी विकास होईल, राज्य सुजलाम् सुफलाम्...

नेतृत्वाचा नवा अध्याय: सौ. जैबुनीसा हमीद शेख यांची ‘एकता मंच’च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड....

Image
  खोपोली/प्रतिनिधी :- कर्तृत्व, जिद्द आणि समाजसेवेचा ठसा उमटवणाऱ्या नेतृत्वाने पुन्हा एकदा राज्यपातळीवर आपली छाप पाडली आहे. खोपोली शहरासह रायगड जिल्ह्यात ‘खंबीर चेहरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. जैबुनीसा हमीद शेख यांची ‘एकता मंच ठाणे’ या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा अल्पसंख्याक महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या प्रभावी कार्याची दखल घेत, २८ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. एकता मंचच्या जिल्हाध्यक्ष पदावरून थेट राज्य प्रदेशाध्यक्ष पदावर झालेली त्यांची बढती ही त्यांच्या संघटन कौशल्याची आणि वाढत्या जनसंपर्काची साक्ष देणारी आहे. जैबुनीसा शेख या केवळ राजकारणा पुरत्याच मर्यादित नसून, विविध जिल्हा व राज्यस्तरीय संस्थांमधून त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. विशेषतः मुस्लिम समाजातील महिलांच्या समस्या मांडणे, तसेच त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक...

कला-सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुरेश साठे यांना राज्यस्तरीय ‘ज्ञानदीप गौरव पुरस्कार’

Image
  खालापूर /सुधीर माने — ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात राज्यस्तरीय “छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथील लोककलावंत, अभिनेते व लावणी सम्राट सुरेश शहाजी साठे यांना कला व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. सुरेश साठे यांनी अनेक वर्षांपासून पारंपरिक लावणी, लोककला आणि भारुड यांचे प्रभावी सादरीकरण करत सांस्कृतिक परंपरांचे जतन व प्रसार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. स्त्री व पुरुष दोन्ही प्रकारच्या भूमिका समर्थपणे साकारत त्यांनी लोककलेला नवी ओळख मिळवून दिली आहे. या कार्यक्रमास शिवव्याख्याते प्रा. सचिन देवरे पाटील, निसर्गोपचार तज्ञ डॉ. रावसाहेब घोडेराव, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले, सचिव मिलिंद कळवणकर, आयटकचे राज्य सचिव राजू देसले, संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सुरेश साठे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फ्रेम, गोल्ड मेडल आणि पुष...

अतिक्रमण हटाव मोहीम: 'गाव' साफ करण्याआधी 'नगरपालिका' स्वतःचे अंगण झाडणार का?

Image
​खोपोली शहरात नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहिमेचा 'धडाका' सुरू झाला आहे. लोकशाहीत जेव्हा लोकप्रतिनिधी नसतात, तेव्हा प्रशासनाची सुस्ती सर्वांनीच अनुभवली. पण आता लोकप्रतिनिधी येताच कारवाईचा बुलडोझर फिरू लागला, ही आनंदाची बाब आहे. एक पत्रकार म्हणून, गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणांविरोधात बातम्यांचा पाठपुरावा केल्यामुळे, मी या मोहिमेचे स्वागतच करतो. पण, ही मोहीम राबवताना प्रशासनाला पडलेला 'विस्मरण' हा रोग मात्र अनाकलनीय आहे. ​' दिव्याखाली अंधार' की जाणीवपूर्वक दुर्लक्ष? ​स्वच्छता मोहिमेचा साधा नियम आहे— आधी स्वतःचे अंगण झाडावे, मग गाव सुधारावे. पण खोपोली नगर परिषदेच्या बाबतीत उलटी गंगा वाहताना दिसत आहे. नगर परिषदेची मुख्य इमारत जिथे आहे, तो परिसर आज अतिक्रमणाच्या विळख्यात पूर्णपणे गुदमरला आहे. हायवेवरून जेव्हा आपण पालिकेकडे वळतो, तिथूनच अतिक्रमणाचे 'दर्शन' व्हायला सुरुवात होते. ​ २५ फुटांचे वाढीव साम्राज्य: इमारतीतील गाळाधारकांनी आपली दुकाने चक्क २० ते २५ फूट पुढे वाढवून ३०० ते ४०० स्क्वेअर फूट जागेवर अनधिकृत क...

निंबोडे येथे सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात संपन्न

Image
  खालापूर /सुधीर माने :- खालापूर तालुक्यातील निंबोडे येथे सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धार्मिक शिस्त आणि परंपरा जपणाऱ्या या गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थ, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुरुवर्य दादा महाराज राणे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच हभप दिलीप महाराज राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि. 26 मार्च 2026 रोजी एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 4 ते 6 वाजता काकड आरतीने झाली. ही आरती मुक्ताबाई महिला मंडळ आणि श्रीराम नवतरुण मंडळ, निंबोडे यांच्या सहभागातून पार पडली. त्यानंतर सकाळी 7 ते 7.30 वाजता कळसपूजन माजी उपसभापती उमेश गावंड, डॉ. सौ. चेतना उमेश गावंड तसेच नगराध्यक्ष सौ. रोशना नरेश मोडवे (नगरपंचायत खालापूर) यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सकाळी 7 ते 8 वाजता श्रीराम प्रभूंची महापूजा खालापूर येथील उद्योजक महेश राठी आणि उपनगराध्यक्ष किशोर पवार यांच्या हस्ते विधीवत पार पडली. पुढे आदरणीय दिलीप भाऊ राणे (हलीवली, कर्जत) यांचे श्रीराम जन्माचे कीर्त...

रसायनी-मोहपाडा येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Image
  खालापूर/मानसी कांबळे :- भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ इंडिया यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला 2026 चा पुरस्कार वितरण सोहळा रसायनी येथील मोहपाडा येथे उत्साहात पार पडला. 22 मार्च रोजी देशभरात साजरा करण्यात आलेल्या या उपक्रमाचा पुढील भाग म्हणून, काही मान्यवरांना नेपाळ येथे उपस्थित राहता न आल्यामुळे राम नवमीच्या औचित्य साधून 26 मार्च रोजी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय संघटक गोरखजी साठे, सल्लागार एन. एम. वाघमारे, अध्यक्ष प्रकाश गायकवाड, पत्रकार प्रशांत खराडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, मेणबत्ती प्रज्वलन आणि बुद्ध वंदनाने करण्यात आली. या सोहळ्यात विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ मायाताई अच्युत शिरसाट यांना प्रदान करण्यात आला. ‘माता सावित्रीबाई फुले पुरस्कार’ रंजना गायकवाड यांना देण्यात आला. खालापूर येथील ‘साप्ताह...